त्याला नेता म्हणून ओळखत नाही़ जमिनीवरील संतरजा उचलणारा कार्यकर्ता अशीच त्याची अमरावतीत ओळख़. मळकट कपडे, वाढलेली दाढी अशा अवतारात अमरावतीच्या सार्वजनिक जीवनात सर्वत्र संचार . मात्र प्रत्येक ठिकाणी स्टेज आणि माईकपासून हा शेकडो योजने दूर राहणार. प्रथमदर्शनी लक्ष वेधून घ्यावा, असा हा निश्चितच नाही़. म्हणायला देशमुख कुटुंबातला़ पण देशमुखात आढळणारी मस्ती, माजोरी, अहंकार दूरपर्यंत नाही़. कमालीची विनम्रता व सौजन्यपूर्ण वागणूक ही याची खासियत़ लहानथोर कोणीही असो, सर्वांसोबत तो सारख्याच सहजतेने वागणारं. बरं ही विनयता, साधेपणा मुद्दामहून पांघरलेलं सोंग आहे, असं अजिबात नाही़ व्यक्तिमत्वाचा अंगभूत भाग असावा इतकं साधेपण सहज चिपकलेलं. असा हा माणूस चाळीस हजारापेक्षा जास्त शेअरहोल्डर असलेल्या डॉ़ पंजाबराव देशमुख अर्बन बँकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवितो, तेव्हा संजय वानखडे हा माणूस गंभीरतेने समजून घ्यावा लागतो़. त्याच्या व्यक्तिमत्वातला धुमसणारा अंगार ज्याला समजतो़ त्यालाच संजय वानखडे कळतो़. जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत संजय वानखडेसारखा माणूस नाही़. मात्र त्याच्या आत्मसन्मानाला तुम्ही धक्का दिला की शेंडीला गाठ पाडल्याप्रमाणे हा मनाशी गाठ बांधून हिशेब चुकते करायच्या मागे लागतो़. मग समोरची माणसं किती ताकदवर आहेत़़ वगैरे विचार तो करत नाही़. भिडायचं ठरलं की मुंगीच्या चिकाटीने पण आतून ज्वालामुखीसारखा उसळून हा तयारीला लागला असतो़. वरुन काहीच पता लागत नाही़. गेल्या निवडणुकीत ज्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन प्रस्थापितांना झोपविलं होतं तेच सहकारी सत्तारुढ होताच तडजोडीची भाषा करतात़ हेकेखोरपणाचा आरोप करुन निर्णय प्रक्रियेतून बाजूला सारतात, हे पाहून याने तीन वर्षांपूर्वीच दुसऱ्यांदा आरपारच्या लढाईचा निर्णय घेतला होता़. याच्यासारखी माणसं जेवढी लोभस आणि विनम्र असतात तेवढेच बिथरले की ते सारं काही उलथून टाकतात. त्याच्या एकेकाळच्या सहकाऱ्यांना गेल्या निवडणुकीत सोबत असूनही हे कळलं नव्हतं, याचं आश्चर्य वाटतं. गेले तीन-साडेतीन वर्ष संजय वानखडे हा अव्यवहारी आहे, खूपच काटेकोर आहे, असा आरोप करुन सत्तेत मशगूल असलेल्यांना वानखडेंचं धुमसणं काय उलथापालथ करु शकते, हे लक्षातच आलं नाही़. बाकीचे संचालक लढाई अजून खूप दूर आहे या मानसिकतेत असताना हा केव्हाच निवडणुकीच्या तयारीला लागला होता़ तब्बल १५-२० हजार नवीन सदस्य याने नोंदविले़. यशाचा जुना फॉर्मुला माहीत होताच़. गेल्या निवडणुकीप्रमाणेच दुचाकीवरुन एकेक घर पालथं घालायला याने सुरुवात केली. निवडणूक हा केवळ शह-काटशह आणि पैशाचा खेळ नसतो, तर एकेक माणूस आपलंस करण्यालाही यात सर्वाधिक महत्व असतं, हे याच्याएवढं कोणालाच माहीत नव्हतं. शेवटी गेल्या निवडणुकीत यांचं भांडवलं काय होतं? अफाट जिद्द, परिश्रम आणि चिकाटी़. याविषयात याला तोडच नाही़. नवल वाटेल पण ४० हजारापेक्षा अधिक सदस्यसंख्या असलेल्या बँकेच्या ३० हजारापेक्षा जास्त सदस्यांना हा माणूस व्यकितश: जाऊन भेटून आला़. नमस्कार करुन त्यांचे आशिर्वाद घेऊन आला़. अनेकांकडे तर हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा गेला़. मेहनत करावी तर किती करावी़? ग़ेले सहा महिने बिनपगारी सुट्टी घेऊन वणवण पायाला भिंगरी लावल्यासारखं वेडपिसं होऊन हा फिरला़. सकाळी ६ ते रात्री कितीही़. याचा तब्येतीवर परिणाम झाला नसता तरच नवला. दोन महिन्यापूर्वी प्रचंड थकवा व पोटात काही नसल्याने चक्कर येऊन मोटरसायकलवरुन खाली पडला़. मेंदूत ब्लड क्लॉट निघाला़. काही तास हा पॅरलिटीक होऊन दृष्टी जाते की काय, अशी स्थिती होती़. डॉक्टर म्हणाले, मरणाच्या तावडीतून थोडक्यात वाचला़. दोन-चार मिनिटं उशीर झाला असता तर खेळ खलास होता़ जवळची सारी माणसं धास्तावली़. जबरदस्तीने याला कसंतरी १५-२० दिवस झोपविलं. पण हा कसला मानतो़? कशीबशी विश्रांती घेऊन पुन्हा भिडला़. पुन्हा वणवण फिरायला लागला़. एकेक गाव, शहर, मतदार पिंजून काढायला लागला़. कागदावरचं प्लॉनिंगही तेवढंच चोख़. सोबतीला आयुष्यात कमविलेली एकमेव श्रीमंती म्हणजे जिवाला जीव देणारे मित्र. संजुची लढाई ही आपलीच लढाई आहे मानून सारं काही झोकून देणारे़ अशा जिगरबाज मित्रांच्या सोबतीने शेवटच्या क्षणापर्यंत या माणसाने आपला टेंपो कायम ठेवला़. सोमवारी मध्यरात्रीच्या ठोक्याला शेवटच्या जागेचा निकाल घोषित झाला तेव्हाच याने साडेतीन वर्षात प्रथमच दीर्घ श्वास घेतला़. …. तो जिंकला नसता तरच नवल होतं!
(संजय वानखडे – ९४२२१५७४२७)
#sanjaywankhade
लेखक हे पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत .
तो जिंकला नसता तरच नवल होतं!
संजय वानखडे याला जी माणसं ओळखतात ती कोणत्याही अर्थाने